वाशिम जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 06:31 PM2018-10-29T18:31:03+5:302018-10-29T18:36:51+5:30
वाशिम : कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी ३० आॅक्टोंबर ते १३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी वाशिम यांनी लागू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे, वाद्य वाजविणे,किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, धार्मिक विधी, सामाजिक सण, लग्न सोहळे यांना हा आदेश लागू राहणार नाही. उपविभागीय अधिकारी यांना या आदेशामधून समोचित प्रकरणामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून सूट देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.