मानोरा बाजार समितीत शेतमालाची आवक वाढताच भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 02:27 PM2018-10-02T14:27:52+5:302018-10-02T14:28:15+5:30

मानोरा : नवीन सोयाबीन व अन्य शेतमालाची आवक वाढताच, मानोरा बाजार समितीत बाजारभाव गडगडल्याने शेतकºयांची दैना कायम असल्याचे दिसून येते.

The price has fallen in the Manora Market Committee | मानोरा बाजार समितीत शेतमालाची आवक वाढताच भाव गडगडले

मानोरा बाजार समितीत शेतमालाची आवक वाढताच भाव गडगडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : नवीन सोयाबीन व अन्य शेतमालाची आवक वाढताच, मानोरा बाजार समितीत बाजारभाव गडगडल्याने शेतकºयांची दैना कायम असल्याचे दिसून येते. हमीभावाच्या नियमाची सर्रास पायमल्ली करणाºयांविरोधात ठोस कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी शेतकºयांमधून होत आहे.
मागील काही वर्षापासुन मजुराअभावी शेतकºयांनी कपाशीकडे पाठ फिरविली. यावर्षी सुरूवातीला बºयापैकी पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत आहे. शेतकरी एका संकटातून सावरत नाही; तोच दुसरे संकट समोर ठाकत आहे. सोमवार, १ आॅक्टोबर हा बाजाराचा पहिला दिवस असतांना शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये सोयाबीन आणले होते. मानोरा बाजार  समिती किमान ५ हजार क्विंटलपर्यंत सोयाबीन ची आवक असल्याने बाजार समितीचे तिन्ही यार्ड पुर्णत: भरलेले होते. जागा नसल्यामुळे बाजार समिती समोरील प्रांगणातही सोयाबीन टाकण्यात आले होते. शेतमाल तारण योजनेच्या सभागृहातही सोयाबीन पोत्याचे ढिग लागले आहेत. आवक वाढताच सोयाबीनचा दर प्रचंड गडगडला आहे. गत आठवड्यात सोयाबीनचे दर प्रती क्विंटल ३५०० ते ३६०० रुपयाच्या घरात होते. १ आॅक्टोबरला प्रती क्विंटल २५०० ते २९०० रुपयापर्यंत सोयाबीनला दर मिळाले. शासनाने सोयाबीनला ३३९९ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तथापि, मानोरा बाजार समितीत हमीभावापेक्षा तब्बल ४०० ते ८०० रुपयापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्याने शेतकºयांची एकप्रकारे लुट सुरू असल्याचे दिसून येते. यामुळे लागवड खर्च आणि मजूरीचा खर्चही वसूल होत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत. हमीभावाने शेतमालाची खरेदी व्हावी, अशी मागणी शेतकºयांनी केली.

Web Title: The price has fallen in the Manora Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.