साखरेपेक्षा गूळच खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:37+5:302021-06-25T04:28:37+5:30
वाशिम : आधी गूळ गरिबांसाठी आणि साखर श्रीमंतीचे लक्षण समजले जायचे; परंतु साखरेत काेणतेही पाेषक घटक नसून यामुळे आराेग्याचा ...
वाशिम : आधी गूळ गरिबांसाठी आणि साखर श्रीमंतीचे लक्षण समजले जायचे; परंतु साखरेत काेणतेही पाेषक घटक नसून यामुळे आराेग्याचा विचार करता नागरिक आराेग्यासाठी हितकारक असलेल्या गुळाकडे वळले असल्याचे व्यापाऱ्याशी केलेल्या चर्चेवरून दिसून येत आहे. आधी गुळाचा चहा काेणी घेत नव्हते, सद्य:स्थितीत गुळाचा चहा प्रतिष्ठेचा बनला आहे.
ग्रामीण भागामध्ये तर पूर्वीपासून गुळाचा वापर हाेत हाेता. साखर महाग असल्याने परवडण्यासारखी नसल्याने सर्रास गुळाचा वापर केला जायचा. ज्यांच्या घरी साखरेचा चहा ते प्रतिष्ठित समजल्या जायचे आजच्या घडीला हे गणित पूर्णपणे उलटे झालेले दिसून येत आहे.
आराेग्यास काहीच फायदा नसलेली साखरेपेक्षा आराेग्यवर्धक गुळाला पसंती दिली जात आहे. गुळाचा चहा, वापर प्रतिष्ठेचा समजला जात आहे. शहरा-शहरांमध्ये अनेक ठिकाणी गुळाच्या चहाचे फलक कॅन्टीनवर झळकताना दिसून येत आहेत. गुळाचे महत्त्व बघता व साखरेपासून हाेणारे परिणाम आज साेशल मीडियाद्वारे सर्वश्रुत झाल्याने गुळाला पंसती दिली जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
..................
प्रकृतीसाठी गूळ चांगला
गुळामध्ये अनेक पेाषक घटक मिळतात. कारण गुळामध्ये लाेह, मॅग्नेशियम, पाेटॅशियम, मँगनिज, व्हिटॅमिन बी, कॅल्शिअम, जस्त, फाॅस्फरस व तांबे यासरखी अनेक महत्त्वाची पाेषकतत्त्वे असतात.
- डॉ. मिनल औधिया,
आहारतज्ज्ञ, वाशिम
.............
गावात मात्र गूळच
ग्रामीण भागात पूर्वीपासून गुळाचा वापर आहे. शहरात गुळाचा वापर वाढण्यास सुरुवात झाली असली तरी ग्रामीण भागात आजही गुळाचीच मागणी आहे.
- मुरलीधर पाकधने,
मूर्तिजापूर, ता. मंगरूळपीर
..............
काही वर्षांआधी प्रत्येक जण साखरेची मागणी करायचा; परंतु शहरात गूळ मागणाऱ्यांच्या प्रमाणात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साखर आराेग्यासाठी घातक असल्याने अनेकांनी गुळाला पसंती दिली आहे. गुळाच्या विक्रीत माेठी वाढ आहे.
- कैलास राठी,
किराणा दुकानदार
.............
आधी साखऱ्याच्या बाेऱ्याच्या बाेऱ्या किराणा दुकानदार घेऊन जायचे. आजच्या घडीला गुळाची मागणी वाढल्याने साखरेसाेबतच गुळाच्या भेल्यांची मागणी हाेत आहे. गूळ आराेग्यासाठी लाभदायक असल्याने ही मागणी वाढली आहे.
- भगवानदास दागडिया
गूळ, साखर व्यापारी
.............
गुळाचा चहा बनले स्टेटस
nआराेग्यासाठी गुळाचे फायदे पाहता शहरांमध्ये गुळाचा चहा पिण्याचे फॅड माेठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील प्रत्येक कॅन्टीन, चहा टपरीवर आज गुळाच्या चहाची मागणी हाेत आहे.
nवाशिम शहरामध्ये छाेटे-माेठे चहाचे एकूण दोन हजारांच्या जवळपास विक्रेते आहेत. यामध्ये काही चहाविक्रेते साेडले, तर प्रत्येक ठिकाणी शहरात गुळाचा चहा मिळत आहे.
nविविध चहाच्या फ्रॅन्चायजी वाशिम शहरात दिसून येतात. यामध्ये अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे.
nवाशिम शहरात गुळाचा चहा देणारी ७ दुकाने आहेत. यामध्ये दरराेज जवळपास ३ ते ४ किलाे गूळ या व्यावसायिकांना लागत आहे.