शेतमालाचे भाव घसरले
By admin | Published: June 7, 2014 10:33 PM2014-06-07T22:33:37+5:302014-06-07T22:53:23+5:30
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
मनभा : मृग नक्षत्र लागायला काही दिवसाचा कालावधी अरला असताना ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
गत खरीप हंगामात अतवृष्टी तर रब्बी हंगामात पीक काढणीच्या वेळी प्रचंड गारपीट यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातूनही सावरत प्रचंड आत्मविश्वासाने शेतकरी खरीप हंगामच्या कामाला लागला. खरीप हंगामासाठी स्वत:च्या माल बाजारात विक्रीसाठी काढला. मात्र बाजारात गहू, हरभरा, सोयाबीन, भुईमुंग, तूर या मालाचे भाव पडल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला. बँकेकडे पीक कर्जासाठी जाणे, बँक भरा त्यानंतर पीक कर्ज देऊन शासनाने वरिष्ठ अधिकार्यांची सांगुनही बँकेचे अधिकारी पुनर्गठण करण्यास तयार नाही. आदेश आलेले नाही. त्यामुळे ते पुनर्गठनाची वाट पाहत आहे. खरीप हंगामाची सर्व तयारी शेतकर्यांनी करून ठेवली. मात्र बी-बियाणे, खतासाठी पैसा नसल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.