तूर व सोयाबीनच्या भावात घसरण सुरूच ; दोन दिवसात २०० रुपयाने भाव कोसळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:53 PM2018-03-13T16:53:50+5:302018-03-13T16:53:50+5:30

वाशिम : तूरीच्या बाजारभावात घसरण सुरूच असून, दोन दिवसात २०० रुपयाने भाव कोसळले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तूरीला प्रति क्विंटल ४००० ते ४३०० रुपये असे भाव होते.

Prices of tur and soybean continue to fall | तूर व सोयाबीनच्या भावात घसरण सुरूच ; दोन दिवसात २०० रुपयाने भाव कोसळले 

तूर व सोयाबीनच्या भावात घसरण सुरूच ; दोन दिवसात २०० रुपयाने भाव कोसळले 

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन तूर बाजारात येताच तूरीला प्रति क्विंटल ४२०० ते ४८०० रुपये या दरम्यान भाव होते. मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात सोयाबीनला ३५०० ते ३८५० रुपयादरम्यान असा भाव होता. १३ मार्च रोजी वाशिम बाजार समितीत तूरीला प्रति क्विंटल ३९०० ते ४१०० रुपये असा भाव मिळाला.

 

वाशिम : तूरीच्या बाजारभावात घसरण सुरूच असून, दोन दिवसात २०० रुपयाने भाव कोसळले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तूरीला प्रति क्विंटल ४००० ते ४३०० रुपये असे भाव होते. १३ मार्च रोजी वाशिम बाजार समितीत तूरीला प्रति क्विंटल ३९०० ते ४१०० रुपये असा भाव मिळाला. दरम्यान, २० दिवसांपूर्वी तेजीत असणारे सोयाबीनचे बाजारभावही कमी होत असल्याचे दिसून येते. 

शेतमालाची आवक वाढली की बाजारभाव गडगडतात याचा अनुभव यावर्षीही तूर उत्पादक शेतकºयांना येत आहे. नवीन तूर बाजारात येण्यापूर्वी साडेपाच हजारापेक्षा अधिक भाव होता. नवीन तूर बाजारात येताच तूरीला प्रति क्विंटल ४२०० ते ४८०० रुपये या दरम्यान भाव होते. त्यानंतर आवक वाढताच बाजारभावात घसरण सुरू झाली.  २० दिवसांपूर्वी तुरीला प्रती क्विंटल ४२०० ते ४६०० रुपयादरम्यान बाजारभाव होते. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तूरीचे बाजारभाव प्रती क्विंटल ४००० ते ४२०० रुपयादरम्यान स्थिर होते. आता दुसºया आठवड्यात १३ मार्च रोजी वाशिम बाजार समितीत तूरीला प्रती क्विंटल ३९०० ते ४१०० रुपये दर होता. वाशिम जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ५० हजार हेक्टरहून अधिक  क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती. वातावरणात वेळोवेळी झालेल्या विपरित बदलांमुळे या पिकाला आधीच फटका बसला. केंद्र सरकारने तुरीला किमान आधारभूत किंमत प्रती क्विंटल ५ हजार ४५० रुपये निश्चित केली आहे. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील तूरीचे प्रति क्विंटल दर ३९०० ते ४१०० रुपयादरम्यान असल्याने हमीभावापेक्षा तब्बल १३०० ते १५०० रुपये कमी दर मिळत आहेत. यामुळे शेतकºयांची एकप्रकारे आर्थिक लूट सुरूच असल्याचे दिसून येते. दुसरीकडे २० दिवसांपूर्वी तेजीत असणारा सोयाबीन बाजारही सध्या तेजीत नसल्याचे दिसून येते. मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात सोयाबीनला ३५०० ते ३८५० रुपयादरम्यान असा भाव होता. मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यात सोयाबीनला ३३५० ते ३७०० रुपयादरम्यान असा स्थिर भाव असल्याचे दिसून येते.

Web Title: Prices of tur and soybean continue to fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.