प्राथमिक आरोग्य केंद्रातच साचले ‘कचऱ्याचे ढीग’

By Admin | Published: January 4, 2017 05:38 PM2017-01-04T17:38:42+5:302017-01-04T17:43:01+5:30

ऑनलाइन लोकमत शिरपूर (वाशिम), दि. 4  - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून, येथे येणाऱ्या रुग्णांना नाकाला ...

In the primary health center, the 'wasteful heap' | प्राथमिक आरोग्य केंद्रातच साचले ‘कचऱ्याचे ढीग’

प्राथमिक आरोग्य केंद्रातच साचले ‘कचऱ्याचे ढीग’

Next
ऑनलाइन लोकमत
शिरपूर (वाशिम), दि. 4  - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून, येथे येणाऱ्या रुग्णांना नाकाला रुमाल बांधून प्रवेश करण्याची वेळ आली आहे.  
मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक सुविधांचा अभाव तर आहेच शिवाय स्वच्छताही नसल्याने सर्वत्र दुर्गंधीचा फैलाव झाला आहे. पुरेशी व्यवस्था नसल्याने खुर्चीवर बसून रुग्णांना सलाईन घेण्याची वेळ आली आहे. तसेच केंद्र परिसरात सर्वत्र कचऱ्यांचे ढीगच्या ढिग साचले आहेत. रुग्णाने आत प्रवेश केल्याबरोबर त्याला नाकाला हात लावण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 

https://www.dailymotion.com/video/x844n7d

Web Title: In the primary health center, the 'wasteful heap'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.