जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रेच आजारी; २०३ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:37 AM2021-02-07T04:37:29+5:302021-02-07T04:37:29+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १५३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. लोकसंख्येच्या तुलनेने ही आरोग्य सुविधा ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १५३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. लोकसंख्येच्या तुलनेने ही आरोग्य सुविधा आधीच कमी असण्यासह या शासकीय रुग्णालयांमध्ये वर्ग- १ चे २, वर्ग-२ चे, ८० एएनएम, ७० एम.पी.डब्ल्यू., २२ आरोग्य पर्यवेक्षक, ११ आरोग्य सहायक, १० वाहन चालक, २ एडीएचओ आणि स्टॅटीस्टिकल ऑफिसर, डीआरसीएचओ, डीटीओचे प्रत्येकी १ पद रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारीही कायमस्वरूपी नसून, कंत्राटी तत्त्वावर ३० पदे भरण्यात आली आहेत. यामुळे रुग्णसेवा वारंवार प्रभावित होत असून, गंभीर आजारातील तसेच गर्भवती महिलांना उपचार न करता शहरी भागातील रुग्णालयांकडे ‘रेफर’ करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
..........................
आकडेवारी अशी
प्राथमिक आरोग्य केंद्र - २५
उपकेंद्र - १५३
एकूण कर्मचारी संख्या
२५०/६१२
एकूण रिक्त कर्मचारी संख्या
५६/१४७
......................
कायमस्वरूपी डॉक्टरच नाहीत
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये विविध स्वरूपातील महत्त्वाची पदे रिक्त असण्यासोबतच कायमस्वरूपी डॉक्टरही कार्यान्वित नाहीत. आरोग्य विभागाकडून कंत्राटी तत्त्वावर काही महिन्यांपूर्वी १० वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली आहेत; मात्र यामुळे प्रश्न सुटलेला नाही.
..................
कोट :
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमधील रिक्त पदे भरण्यासंबंधी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. हा प्रश्न लवकरच निकाली निघणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याचे सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम