आज वाजणार कारखेडा येथील प्राथमिक शाळेची घंटा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:57+5:302021-09-16T04:51:57+5:30
गुरुवार, दि.१६ सप्टेंबरपासून शाळेला रीतसर सुरुवात होणार आहे. गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून जि. प. प्राथमिक शाळा बंद आहेत. ...
गुरुवार, दि.१६ सप्टेंबरपासून शाळेला रीतसर सुरुवात होणार आहे.
गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून जि. प. प्राथमिक शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमात मोढ्या अडचणी निर्माण होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाचा विसर पडत आहे. जि. प. प्राथमिक शाळेत शाळा चालू करण्यासंदर्भात पालक सभेचे आयोजन ८ सप्टेंबर रोजी केले होते. पालक सभेत कोविड-१९चे पालन करून १०० टक्के शाळा चालू करण्यासंदर्भात समंती दिली. त्याअनुषंगाने गटशिक्षण अधिकारी यांना शाळा सुरू करण्याबाबत पत्र देऊन शाळा सुरू करत असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी सरपंच सोनाली बबनराव देशमुख, उपसपंच अनिल काजळे, शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पोतदार, रणजित जाधव, कविता चौधरी, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा मीना विनोद ढोके, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चव्हाण, गणेश जाधव, चैताली परांडे, दिलीप देशमुख, बाळू जाधव, मनोज किशोर तायडे यांची उपस्थिती होती. गावात असणाऱ्या के. एल. देशमुख शाळेत ८ ते १२ वर्ग यापूर्वीच सुरू करण्यात आले व ५ ते ७ शाळा सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतच्या वतीने पत्र देण्यात आले आहे.
००००
प्राथमिक शाळा सुरू करण्याचा पहिलाच प्रयोग
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंदच आहेत. कोरोनामुक्त असलेल्या कारखेडा गावात प्राथमिक शाळा सुरू करण्यास सर्वच घटकांची संमती मिळाली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक वर्ग सुरू होत आहे. जिल्ह्यात यंदा पहिल्यांदा कारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वर्ग सुरू होत आहेत.