प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:47+5:302021-06-20T04:27:47+5:30
जिल्ह्यातील सोयाबीन, तेलवर्गीय पीक प्रक्रिया उद्योगांना यामुळे गती मिळणार असून असंघटित क्षेत्रातील लाकडी तेलघाना, सोयाबीन प्रकिया उद्योगांसाठी ही योजना ...
जिल्ह्यातील सोयाबीन, तेलवर्गीय पीक प्रक्रिया उद्योगांना यामुळे गती मिळणार असून असंघटित क्षेत्रातील लाकडी तेलघाना, सोयाबीन प्रकिया उद्योगांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. वैयक्तिक लाभार्थी, बचतगट, शेतकरी कंपनी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. सोयाबीन प्रक्रिया उद्योग स्तरवृद्धी, विस्तारीकरण, आधुनिकीकरण यासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. नवीन उद्योग असल्यास सोयाबीन प्रक्रियेसाठी तर जुना उद्योग असल्यास सोयाबीन, करडी लाकडी तेलघाना, खाद्यपदार्थ यासाठी लाभ घेता येईल. वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, पासिंग सर्टिफिकेट, राहत्या घराचे वीज बिल, बँक पासबुक मागील सहा महिन्यांची छायांकित प्रत, उद्योग ज्या जागेत करणार त्याचे घरपत्रक उतारा, भाडे करारपत्र, मशिनरी कोटेशन, नवीन बांधकाम करणार असल्यास सातबारा, बांधकाम नकाशा व अंदाजपत्रक इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. वैयक्तिक लाभासाठी संकेतस्थळावर अर्ज करावा. शेतकरी कंपनी, बचतगटांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले.