रिसोड येथे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा
By admin | Published: March 21, 2017 03:07 AM2017-03-21T03:07:07+5:302017-03-21T03:07:07+5:30
मुद्रा योजनेविषयी तालुका स्तरावर मार्गदर्शन ; उद्या मालेगाव येथे मेळावा
वाशिम, दि. २0- सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योग, व्यापार व व्यवसाय उभारणीसाठी सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रसार, प्रचारासाठी जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावर प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. या अंतर्गत २१ मार्च २0१७ रोजी सकाळी ११ वाजता रिसोडमधील गुजरी चौक येथील नगरपरिषद प्राथमिक शाळेमध्ये तालुकास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्हा अग्रणी बँक व तहसीलदार कार्यालयांच्यावतीने हे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.
२२ मार्च २0१७ रोजी मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसर, २३ मार्च २0१७ रोजी कारंजा तहसीलदार कार्यालय परिसर, २४ मार्च २0१७ रोजी मंगरूळपीर, २७ मार्च २0१७ रोजी मानोरा तहसीलदार कार्यालय परिसर येथे तालुकास्तरीय व २९ मार्च २0१७ रोजी वाशिम येथे जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा होणार आहे. या मेळाव्यांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहून प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कर्जाचे अर्ज स्वीकारतील.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून लघु व्यवसाय व उद्योगांना मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करण्यात येते. वैयक्तिक व्यावसयिक, खाजगी व्यवसाय, भागीदारीतील व्यवसाय, भागीदारीतील व्यवसाय, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी यासारख्या विविध व्यवसायांना मुद्रा योजनेतून कजार्चा लाभ मिळू शकतो; मात्र अर्जदार कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसला पाहिजे. नवीन उद्योग सुरु करणे अथवा सुरु असलेला उद्योग वाढविणे, व्यावसायिक गरजा पूर्ण करून उत्पन्नात वाढ करण्यासाठी आवश्यकतेनुसार मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी तसेच या योजनेंतर्गत कर्ज प्राप्त करून घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे अवाहन जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीने केले.