मालेगावात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा

By admin | Published: March 22, 2017 06:23 PM2017-03-22T18:23:49+5:302017-03-22T18:23:49+5:30

बुधवारी मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसरात मेळावा घेण्यात आला असून, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

Prime Minister's currency loan rally in Malegaon | मालेगावात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा

मालेगावात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा

Next

वाशिम : प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी जनजागृती म्हणून प्रत्येक तालुक्यात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावे घेण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवारी मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसरात मेळावा घेण्यात आला असून, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
मेळाव्याला नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडारे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, तहसीलदार रवी राठोड, स्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर धारगावे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते. यावेळी विजय खंडारे म्हणाले की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून बेरोजगार युवकांना सहज व कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही लहान-मोठे उद्योग, व्यवसाय सुरु होऊन बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मुद्रा योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी युवकांनी प्रथम आपला व्यवसाय निश्चित करावा. त्यानुसार आवश्यक यंत्र सामग्री अथवा कच्चा मालाचे कोटेशन, व्यवसायाचा पत्ता यासह इतर कागदपत्रे जोडून आपला अर्ज बँकेकडे सादर करावा. त्यानंतर सदर बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील व त्यानुसार कर्ज मंजूर करण्यात येईल, असे खंडारे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नगराळे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज प्रकाराबाबत मार्गदर्शन केले. तहसीलदार राठोड यांनी प्रास्ताविकामध्ये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याच्या आयोजनाचा हेतू विषद केला.  याप्रसंगी वैद्य, धारगावे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. संचालन मंडळ अधिकारी सुनील लोखंडे यांनी केले.

Web Title: Prime Minister's currency loan rally in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.