प्रधानमंत्री आवास योजनेत अमरावती विभागात वाशिम अव्वल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 02:46 PM2018-08-04T14:46:04+5:302018-08-04T14:49:10+5:30

वाशिम: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) जुलै २०१८ पर्यंत उद्दिष्ट गाठण्यात अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. सन २०१८-१९ या वर्षात वाशिम जिल्ह्यात घरकुलांचे ५०.५८ टक्के उद्दिष्ट गाठले आहे.

Prime Minister's housing scheme, Washim is the topper In Amravati division | प्रधानमंत्री आवास योजनेत अमरावती विभागात वाशिम अव्वल 

प्रधानमंत्री आवास योजनेत अमरावती विभागात वाशिम अव्वल 

Next
ठळक मुद्देबुलडाणा दुसºया क्रमांकावर असून, अकोला जिल्हा माघारल्याचे दिसून येते.सन २०१८-१९ या वर्षात वाशिम जिल्ह्यात घरकुलांचे ५०.५८ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. अकोला जिल्ह्यात १९३१३ पैकी ५८८० घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, ही टक्केवारी ३०.४५ अशी येते.

वाशिम: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) जुलै २०१८ पर्यंत उद्दिष्ट गाठण्यात अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. सन २०१८-१९ या वर्षात वाशिम जिल्ह्यात घरकुलांचे ५०.५८ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. बुलडाणा दुसºया क्रमांकावर असून, अकोला जिल्हा माघारल्याचे दिसून येते.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ दिला जातो. शासनातर्फे सन २०१६-१७ ते २०१८-१९ या वर्षात जिल्हानिहाय घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यानुसार अमरावती विभागात वाशिम जिल्हा ५ हजार ५६२, बुलडाणा जिल्हा १४ हजार ३१०, यवतमाळ जिल्हा १८ हजार ४३४, अमरावती जिल्हा ३४ हजार २८ आणि अकोला जिल्ह्यात १९ हजार ३१३ असे घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले. सदर उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद यंत्रणा कामाला लागली असून, दरमहा यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून आढावा घेतला जातो. जुलै २०१८ अखेर राज्यात एकूण ४२.२८ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. राज्यात एकूण चार लाख ४९ हजार ८२० पैकी एक लाख ९० हजार १९४ घरकुलांचे काम पूर्ण झाले. अमरावती विभागात उद्दिष्ट गाठण्यात वाशिम जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. २ आॅगस्टपर्यंत वाशिम जिल्ह्यात ५५६२ पैकी २८१३ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून याची टक्केवारी ५०.५८ अशी येते. दुसºया क्रमांकावर बुलडाणा जिल्हा असून एकूण १४३१० पैकी ७२१२ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, ही टक्केवारी ५०.४० येते. यवतमाळ जिल्ह्यात १८४३४ पैकी ६९२१ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, ही टक्केवारी ३७.५४ आहे. अमरावती जिल्ह्यात ३४०२८ पैकी १०६६८ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून ही टक्केवारी ३१.३५ अशी येते. अकोला जिल्ह्यात १९३१३ पैकी ५८८० घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, ही टक्केवारी ३०.४५ अशी येते.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामासंदर्भात वेळोवेळी आढावा घेतला जातो. घरकुलांचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन केले असून, अधिकारी-कर्मचाºयांच्या सहकार्यातून अंमलबजावणी सुरू आहे. सन २०१६-१७ ते २०१८-१९ या वर्षात वाशिम जिल्ह्याला ५ हजार ५६२ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यापैकी २ आॅगस्टपर्यंत २८१३ घरकुलांचे काम पूर्ण झाले. घरकुलांचे उर्वरीत उद्दिष्टदेखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- दीपक कुमार मीणा,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, वाशिम.

 

Web Title: Prime Minister's housing scheme, Washim is the topper In Amravati division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.