गोर बंजारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड यांची निवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:34+5:302021-02-06T05:17:34+5:30
तिसऱ्या अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचे राणसिंग फुंकले गेले असून, दिनांक १० व ११ एप्रिल २०२१ रोजी ...
तिसऱ्या अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचे राणसिंग फुंकले गेले असून, दिनांक १० व ११ एप्रिल २०२१ रोजी अवलिया संस्थान, काळामाथा, ता. मालेगाव, जि. वाशिम येथे हे संमेलन आयोजित केले गेले असल्याचे साहित्य संघाच्या संयोजन समितीने कळविले आहे. तिसऱ्या अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी २६ जानेवारी २०२१ रोजी साहित्य संघाचे शाखा कार्यालय, नागपूर येथे गोर बंजारा साहित्य संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये साहित्य संघाला प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, साहित्यिकांचे प्रकाशित झालेले ग्रंथ, आगामी काळात प्रकाशित होणारे ग्रंथ, वृत्तपत्रे, साप्ताहिक, गौरवग्रंथ, ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना, प्रत्यक्ष व्याख्यानांमध्ये असलेला सहभाग व भूमिका आणि सामाजिक कार्यातील सहभाग, या सगळ्या बाबींचा विचार करता नागपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड यांची आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे, असे साहित्य संमेलनाचे मुख्य मार्गदर्शक नामा नायक यांनी साहित्य संघाच्या वतीने जाहीर केले आहे.