देवपेठ येथील जुगार अड्डयावर छापा
By admin | Published: July 7, 2015 01:10 AM2015-07-07T01:10:43+5:302015-07-07T01:10:43+5:30
पोलीस अधीक्षकाचा विशेष पथकाची कारवाई.
वाशिम : छुप्या रितीने वरली मटका सुरू असलेल्या शहरातील देवपेठ परिसरात पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने ६ जुन रोजी छापा टाकला. या छाप्यामध्ये वरली मटक्याचे साहित्य व रोख ३७५0 रूपये जप्त करून आरोपिला अटक केली. पोलिस अधिक्षक विनिता साहु यांनी वाशिम जिल्हा पोलिस दलाची सुत्रे हाती घेतल्यानंतर संबंधीत पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांना आपल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना दिल्या. तेंव्हापासुन जिल्ह्यातील कारंजा, मानोरा व मंगरूळपीर तालुका वगळता इतर तालुक्यातील अवैध व्यावसायीकांनी उघडरित्या सुरू असलेले जुगार अड्डे बंद केले. वाशिम शहरामध्ये देवपेठ परिसरातील हरिष गोपालदास लढ्ढा हा इसम बिनदिक्कत वरली मटक्याचा व्यवसाय छुप्या रितीने करीत असल्याची माहीती पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी लढ्ढा याचे किराणा दुकानालगत छापा टाकुन वरली मटका व रोख ३७५0 रूपये जप्त केले. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल वाघ, सिध्दार्थ राऊत, अरविंद सोनुने, संदीप इढोळे, विनोद अवगळे, विपुल शेळके व रजनी सरकटे यांच्या पथकाने केली.