पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला काँग्रेस पदाधिकार्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:11 AM2017-09-25T01:11:54+5:302017-09-25T01:12:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवार, २४ सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘अच्छे दिन’चे गाजर दाखविणार्या विद्यमान सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे भव्य स्वागत व सत्कार जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की विद्यमान सरकारने शेतकर्यांसह सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागून, स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घ्याव्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी माजी मंत्री अनंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष अँड. दिलीपराव सरनाईक, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, गोपाळराव आटोटे गुरुजी, दौलत हिवराळे, माजी आमदार किसनराव गवळी, माजी जि.प. अध्यक्ष अरविंद इंगोले, जि.प. सदस्य ज्योती गणेशपुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजूभाऊ चौधरी, काँग्रेसचे युवा नेते नकुल देशमुख, महिला अध्यक्ष बानूताई चौधरी, सभापती गजानन भोने, किसनराव मस्के, नामदेव मापारी, सरकार इंगोले, तालुकाध्यक्ष परसराम भोयर, इफ्तेखार पटेल, गजानन लाटे, गजानन पाचरणे, रमेश लांडकर, जि.प. सदस्य चक्रधर गोटे, सुभाष शिंदे, नथ्थूजी कापसे, विकास गवळी, प्रल्हाद उलेमाले, दिलीप देशमुख, डॉ. जगदीश घुगे, दिलीप भोजराज, अशोक गवळी, राजेश भारती, फारूकभाई, वाय.के. इंगोले, बाबूराव शिंदे, सागर गोरे, अँड. पी.पी. अंभोरे, वसंतराव इरतकर, नगराध्यक्ष यशवंत देशमुख, प्रा. अबरार मिर्झा, जावेद मिर्झा, अर्जुन उदगिरे, जावेद परवेज, राजू घोडीवाले, मिलिंद पाकधने, विशाल सोमटकर, कुसुम गोरे, डॉ. अरुण देशमुख, श्याम उफाळे, हरीश चौधरी, अभय राठोड, प्रा. दादाराव देशमुख, रंजना देशमुख, शालीराम राठोड, तात्याराव देशमुख, नंदा गणोदे, प्रा. संतोष डिवटे, किशोर पेंढारकर, निळकंठ कुटे, बाळाअप्पा गोंडाळ, अनिल धुळे, सुनील मापारी, पंडितराव सरनाईक, आरिफ खान, विशाल वाघमारे, रूपेश भोसले, वैभव सरनाईक, गोपाल सरनाईक आदींची उपस्थिती होती. संचालन दादाराव देशमुख तर आभार प्रा. अबरार मिर्झा यांनी मानले.