खासगी शाळांचा ‘बंद’
By admin | Published: July 5, 2016 12:57 AM2016-07-05T00:57:52+5:302016-07-05T00:57:52+5:30
वाशिम जिल्ह्यातील २७0 शाळांचा आंदोलनात सहभाग; प्रलंबित मागण्यांची पुर्तता करण्याची मागणी.
वाशिम : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी खासगी शिक्षण संस्था चालकांच्या राज्यस्तरीय संघटनेने ४ जुलै रोजी माध्यमिक शाळा बंदची हाक दिली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील १00 टक्के शाळा सहभागी झाल्या. या संपामुळे विद्यार्थ्यांंंना आल्या पावली परत जावे लागले. घोषित शाळांना प्रचलित नियमानुसार पात्र टप्पा अनुदान देण्यात यावे, उच्च माध्यमिक शाळांना घोषीत करुन त्वरित अनुदान देण्यात यावे, सन २00४ ते २00५ पासूनचे थकीत वेतनतर अनुदान पुर्वीप्रमाणे सर्व शाळांना त्वरित देण्यात यावे, प्राथमिक शाळेत लिपीक व सेवकांची पदे मान्य करावी, शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या बाबतीत नेमलेल्या समितीचा अहवाल स्विकारुन त्यानुसार तात्काळ पद भरती सुरु करावी, २५ टक्के राखीव जागावर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांंंच्या शिक्षण शुल्कांच्या रक्कमेचा परतावा शाळांना त्वरित मिळावा, विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांंंना अनुदानित शाळेप्रमाणे शालेय पोषण आहार व पाठयपुस्तकांचा लाभ द्यावा, २0 पटांच्या आतील शाळा बंद करण्यात येवू नये यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी खासगी माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यात २७0 च्या आसपास खासगी माध्यमिक शाळा असून, सोमवारच्या संपात या सर्व शाळा सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. शाळा बंद असल्याचे पाहून विद्यार्थ्यांंंना परत जावे लागले. संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष भऊसाहेब सोमटकर सचिव अँड. किरणराव सरनाईक, देवीदास नागरे, प्रा. भाऊसाहेब काळे, अशोक कांबळे, नारायण काळबांडे, अनिल गवळी, बि.टी. बिल्लारी, देवीदास कापूरे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अशोकराव ठाकरे, विजय शिंदे, रविंद्र खुणे, विनोद नरवाडे, मंगेश धानोरकर, उदय दर्यापूरकर तसेच शिक्षक संघटनेचे बाळासाहेब गोटे, राजु नंदकुले, राजकुमार बोनकिल्ले, एस. एल. राठोड, विनायक उज्जेनकर, गोविंद चतरकर, अनंत सुपनात, महादेव बांगर, शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश पसारकर, गिरीष जिचकार, तुकाराम बाकडे, विष्णू बाजड, रूपेश मुंदडा, कदम, बोराळकर, ठाकरे, रामराव कायंदे, मधुकर चवरे, गणेशराव देशमुख आदींनी या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.