खासगी बियाण्याला अल्प प्रतिसाद !
By Admin | Published: July 9, 2017 07:51 PM2017-07-09T19:51:55+5:302017-07-09T19:51:55+5:30
वाशिम - यावर्षीच्या बियाणे विक्रीवर नजर टाकली तर खासगी बियाण्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. ४७ हजार पैकी ३६ हजार क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - यावर्षीच्या बियाणे विक्रीवर नजर टाकली तर खासगी बियाण्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. ४७ हजार पैकी ३६ हजार क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे.
यावर्षी पावसात सातत्य नसल्याने सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन व अन्य बियाणे वापरल्याचे दिसून येते तसेच महामंडळाचे महाबीज बियाणे खरेदी केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने बियाण्याची मागणी नोंदविल्यानंतर एकूण ८३ हजार ३६५ क्विंटल बियाणे प्राप्त झाले. यापैकी ६६ हजार ८८० क्विंटल बियाण्याची विक्री झाली. महाबीजचे ३५ हजार ३३८ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होते. यापैकी ३० हजार ५७० क्विंटल बियाण्याची विक्री झाली. खासगी क्षेत्रातील ४६ हजार ६७७ क्विंटल बियाणे प्राप्त झाले. यापैकी ३५ हजार ६६० क्विंटल बियाण्याची विक्री झाली. मागणीच्या तुलनेत बियाण्याचा कमी पुरवठा झालेला असतानाही, ७ जुलैपर्यंत १६ हजार ४८५ क्विंटल बियाणे शिल्लक आहे.