शिरपूर येथे खासगी दुरसंचार कंपनीने खोदून ठेवले रस्ते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 06:06 PM2019-06-26T18:06:28+5:302019-06-26T18:07:59+5:30
शिरपूर येथे खासगी दुरसंचार कंपनीने खोदून ठेवले रस्ते!
पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटली : नागरिकांची गैरसोय लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम) : खासगी दुरसंचार क्षेत्रातील रिलायन्स कंपनीने जमिनीखालून ‘आॅप्टीकल फायबल केबल’ टाकण्याचे काम करित असताना ठिकठिकाणचे रस्ते खोदून ठेवले आहेत. यामुळे गावातील अनेकांच्या पाणीपुरवठा योजनेचे पाईप फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला. परिणामी, नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. केबल टाकण्याचे काम करित असताना संबंधित कंपनीने गवळीपुरा भागातील पोलीस स्टेशनकडे जाणारा रस्ता खोदून ठेवला आहे. हे काम करताना परिसरातील अनेकांच्या नळ जोडण्या तुटल्या. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन ठिकठिकाणी नादुरूस्त झाली. त्याचा परिणाम पाणीपुरठ्यावर झाल्याने नागरिकांमधून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त होत आहे. शिरपूरातील गवळीपुरा ते पोलीस स्टेशन या रस्त्यावर खासगी दुरसंचार कंपनीने केबल टाकण्यासाठी रस्ता खोदून ठेवला. यात नळ जोडण्याही तुटल्याने पिण्याचे पाणीही मिळेनासे झाले आहे. - सुनील गावंडे शिरपूर जैन गावात जमिनीखालून फायबर केबल टाकण्यासाठी संबंधित कंपनीने परवानगी घेतलेली आहे. कामादरम्यान रस्ते नादुरूस्त झाले. त्याची भरपाई कंपनीकडून वसूल केली जाईल. इ.ढ. भुरकाडे ग्रामविकास अधिकारी, शिरपूर जैन