नांदेड काँग्रेस कार्यकर्ता गोळीबार प्रकरणी मंगरुळपीर ठाणेदाराची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 02:19 PM2020-01-10T14:19:42+5:302020-01-10T14:19:47+5:30
मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार असलेले विनोद दिघोरे यांना चौकशीसाठी नेण्यात आले.
वाशिम : नांदेड येथील काँग्रेस कार्यकर्ते तथा गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावरील गोळीबार प्रकरणात काही पोलीस अधिकाºयांनी मदत केल्याची बाब पुढे येत आहे. त्या अनुषंगाने नांदेडचे तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेत तथा सद्यस्थितीत मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार असलेले विनोद दिघोरे यांना चौकशीसाठी नेण्यात आले.
कोकुलवार गोळीबार प्रकरणात विरेंद्र कोनाजी उर्फ भंडारीला अटक केल्यानंतर या प्रकरणात काही पोलीस अधिकाºयांनी कुख्यांत गुंड रिंधाला मदत केल्याचे पुढे येत आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी ठाणेदार दिघोरे यांना नांदेड येथील पोलीसांनी वाशिम येथून चौकशीसाठी नेले.
नांदेड येथील एका प्रकरणात चौकशीसाठी नांदेड येथे मंगरुळपीरचे ठाणेदार गेले आहेत. ते तेथे असतांना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या गुन्हयाबाबत जबानीसाठी जावेच लागत असते.
- वसंत परदेसी
पोलीस अधीक्षक, वाशिम
नांदेड येथील एका गुन्हयात मला साक्ष देण्यासाठी बोलविले होते.
विनोद दिघोरे
ठाणेदार, मंगरुळपीर