जिल्ह्यातील ३४०० ऑटोचालकांच्या ‘रोटी’चा प्रश्न मिटला; इतरांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:39 AM2021-04-15T04:39:54+5:302021-04-15T04:39:54+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध कठोर करतानाच परवानाधारक ऑटोचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याची ...
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध कठोर करतानाच परवानाधारक ऑटोचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याची घोषणाही केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील परवानाधारक जवळपास ३४०० ऑटोचालकांना मिळणार आहे. परमिट नसलेल्या तसेच इतर चालकांचे काय हा प्रश्न मात्र कायम आहे.
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत राज्य शासनाने निर्बंध कठोर केले आहेत. यादरम्यान गोरगरीब नागरिक, ऑटोरिक्षाचालकांना आर्थिक दिलासा म्हणून परवानाधारक ऑटोचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले. जिल्ह्यात जवळपास साडेसात हजार ऑटो असून, यापैकी जवळपास ३४०० ऑटो हे परमिटवाले आहेत. त्यांना दीड हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे.
००
जिल्ह्यातील परवानाधारक ऑटोचालकांची संख्या १५००
000
कोट बॉक्स
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध कडक केले आहेत. ऑटोचालकांना किमान तीन हजार रुपये मिळायला हवे होते. संचारबंदीमुळे प्रवाशी मिळणे कठीण आहे.
- प्रदीप आठवले
०००
संचारबंदीमुळे नागरिक घराबाहेर पडणार नाहीत. त्यामुळे ऑटोमध्ये प्रवाशी कुठून बसणार हा प्रश्न आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी तीन ते चार हजार रुपये मिळायला हवे.
- संदीप खडसे
०००
कोरोनामुळे प्रवाशी मिळणे कठीण आहे. ऑटोचालकांना दिलासा म्हणून शासनाने दीड हजार रुपये जाहीर केले. यामुळे थोडाफार आधार मिळणार आहे.
- गजानन लाड