गाव तलावाचा प्रश्न रखडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:57+5:302021-05-12T04:41:57+5:30
गाव परिसरातील नदी नाल्यावर सक्षम असे सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव होण्यास पुरेसा वाव आहे. गावांसाठी किमान एक ...
गाव परिसरातील नदी नाल्यावर सक्षम असे सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव होण्यास पुरेसा वाव आहे. गावांसाठी किमान एक तरी तलाव व्हावा म्हणून १७ वर्षांपासून गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविले. मात्र, ग्रामस्थांच्या पदरात आश्वासनांची खैरात पडण्यापलीकडे काहीही पडले नाही. गावाच्या सीमावर्ती भागात एकही तलाव नाही. गाव परिसरात तलावच नसल्याने येथील नदीनाल्याचे पाणी वाहून जाते. या ठिकाणी 'पाणी अडवा पाणी जिरवा'चा एकही उपक्रम राबविण्यात आलेला नाही. गत काही वर्षांपासून गावकऱ्यांची तहान टँकरद्वारा भागविली जात आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच जलस्रोतांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण होतो. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी टंचाई निकाली काढण्यासाठी व शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी या ठिकाणी लघू सिंचन प्रकल्प, गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते तब्बल १७ वर्षांपासून संघर्ष करत आहेत. परंतु, शासन व प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने गाव तलावाचा प्रश्न निकाली निघू शकला नाही.