लाईनमनअभावी उद्भवली समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:28 AM2021-06-24T04:28:12+5:302021-06-24T04:28:12+5:30
................... रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी वाशिम : जऊळका रेल्वे (ता. मालेगाव) येथील काही ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली ...
...................
रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी
वाशिम : जऊळका रेल्वे (ता. मालेगाव) येथील काही ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष पुरवून रस्ता दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
........................
शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित
वाशिम : चालू वर्षी १९ मार्च रोजी अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन बिजवाई कांद्याचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मात्र अद्यापपर्यंत मदत मिळालेली नाही. ती देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
..................
ग्रामस्थांनी गाफील न राहण्याचे आवाहन
वाशिम : ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्गाचे संकट बहुतांशी निवळले आहे; मात्र ग्रामस्थांनी गाफील राहू नये. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
........................
फेरीवाल्यांचे व्यवसाय पूर्वपदावर
वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध १४ जूनपासून पूर्णत: शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे फेरीवाल्यांचेही व्यवसाय पूर्वपदावर आल्याचे दिसून येत आहे.
.................
जीवघेण्या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता
वाशिम : स्थानिक पुसद नाका व हिंगोली नाका येथील रस्त्याला जीवघेणा खड्डा पडला आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून रात्रीच्या सुमारास खड्डा चुकविण्याच्या नादात लहानसहान अपघातांच्या घटनाही घडत आहेत. खड्डे तत्काळ बुजवा; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.