‘त्या’ रस्त्यांमुळे चालकांना अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:47 AM2021-09-23T04:47:17+5:302021-09-23T04:47:17+5:30
सांडपाण्यामुळे आरोग्याला धोका वाशिम : तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यास दिरंगाई होत असल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, ...
सांडपाण्यामुळे आरोग्याला धोका
वाशिम : तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यास दिरंगाई होत असल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, तर ‘महावितरण’कडून अनियमित वीजपुरवठा होत असल्यानेही ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी
वाशिम : तालुक्यातील चिंचाबाभर येथे मागील २ वर्षांपासून लोणी बु. ते चिंचाबाभर रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. मात्र, या पुलाच्या कामाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या बाबीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालून चिंचाबाभर रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोकराव सानप यांनी केली आहे.
चौकाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी
मंगरूळपीर : स्थानिक नासरजंग चौकाचे सौंदर्यीकरण करून या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी टिपू सुलतान सेनेच्या वतीने पालिकेकडे करण्यात आली आहे, तसेच या ठिकाणी पाण्याची टाकी, ग्रंथालय उभारून हज यात्रेकरूंसाठी प्रशिक्षण केंद्र उभारावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश आठवडी बाजार बंदच
वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आल्याने अनेक उद्योग, व्यवसायांना प्रशासनाने परवानगी दिली; परंतु अद्याप आठवडी बाजार भरविण्याचे स्पष्ट निर्देश नसल्याने अनेक ठिकाणचे आठवडी बाजार अद्यापही बंदच दिसून येत आहेत. काही व्यावसायिक मात्र आपली दुकाने थाटताना दिसून येत आहेत.