शाळा, महाविद्यालयांचे प्रश्न मार्गी लावावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:41 AM2021-09-19T04:41:53+5:302021-09-19T04:41:53+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शाळामध्ये रिक्त पदे आहेत, अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत, मुलांना अध्यापनासाठी शिक्षक नाही, शिक्षकेतर पदे ...
गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शाळामध्ये रिक्त पदे आहेत, अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत, मुलांना अध्यापनासाठी शिक्षक नाही, शिक्षकेतर पदे कमी केली आहेत, अनेक वर्षांपासून शाळांना वेतनेतर अनुदान बंद आहे, आता कुठे काही रक्कम मंजूर केली ती अद्याप प्राप्त झाली नाही. अनेक शिक्षकांना वेतन आयोगाचे हप्ते नाही. महाविद्यालयीन प्राध्यापक, ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनुदान व इतर सुविधा मिळत नसल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये असंतोष आहे. याबाबत शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षण संस्थाचालक संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे यांनी केली आहे.
------
पोषण माह अंतर्गत गृहभेटी
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पोषण माह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत आयोजित या पोषण माहमध्ये गृहभेटी देणे, माता समितीची सभा, मुलीच्या जन्माचे वृक्षारोपण करून स्वागत करणे, गरोदर, स्तनदा महिलांना योग्य समुपदेशन करणे, किशोरवयीन मुलींना आहार आणि आरोग्याची योग्य माहिती पुरविणे, पथनाट्याद्वारे पोषणाची जनजागृती करणे अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे.