सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 05:21 PM2020-10-04T17:21:51+5:302020-10-04T17:22:12+5:30

Agriculture News रब्बी हंगामात पेरणीसाठी पैशांची जूळवाजुळव कशी करावी? याची चिंता शेतकºयांना लागली आहे.

Problems of soybean growers increase! | सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या !

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या !

googlenewsNext

मूंगळा : यावर्षी संततधार आणि सततच्या पावसामुळे मूंगळा परिसरात सोयाबीनच्या उत्पादनात कमालिची घट येत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली. अनेक शेतकºयांचा शेतीतील लागवड खर्चही वसूल होत नसल्याने रब्बी हंगामात पेरणीसाठी पैशांची जूळवाजुळव कशी करावी? याची चिंता शेतकºयांना लागली आहे.
यावर्षी पावसात अनियमितता असल्याने याचा फटका शेतकºयांना बसत आहे. मुंगळा परिसरातील शेतकºयांना मूग व उडीदाच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट आली. त्यानंतरही पावसाने अधूनमधून हजेरी लावली. सोयाबीन सोंगणी व काढणीच्या हंगामातही पाऊस आला. त्यामुळे अनेक शेतकºयांचे सोयाबीन भिजले. गत पाच, सहा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंगळा परिसरात सोयाबीन पिकाची काढणीला जोरात सुरू आहे. शेतीची मशागत, बी-बियाणे, पेरणीचा खर्च आणि कापणी तसेच मळणी यंत्र आदीवर १५ ते १७ हजार रुपयापर्यंत खर्च आला आहे. अनेक शेतकºयांना एकरी ४ ते ५ क्विंटल उतार येत आहे. हलक्या दर्जाच्या जमिनीत तर एक ते तीन क्विंटलदरम्यान उतार आहे. लागवड खर्च वजा करता शेतकºयांना फारशी मिळकत नाही. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणीसाठी जूळवाजुळव करावी लागणार आहे.


बाजारभावही समाधानकारक नाही
सोयाबीन भिजल्याने बाजारभाव समाधानकारक नाही. काही शेतकºयांचे सोयाबीन दर्जेदार असतानाही, समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याचे दिसून येते. प्रती क्विंटल २८०० ते ३३०० रुपयादरम्यान सोयाबीनची खरेदी केली जात आहे. यामुळे शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे.

Web Title: Problems of soybean growers increase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.