पथदिव्यांअभावी ग्रामस्थांना अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:46+5:302021-09-02T05:29:46+5:30
------------------ वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान वाशिम : खरीप हंगामातील पिके आता चांगलीच बहरली आहेत; परंतु आता वन्यप्राणी या पिकांवर ताव ...
------------------
वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान
वाशिम : खरीप हंगामातील पिके आता चांगलीच बहरली आहेत; परंतु आता वन्यप्राणी या पिकांवर ताव मारत आहेत. यात रोहींचे कळप शेकडो एकर क्षेत्रातील शिवारात धुडगूस घालून सोयाबीन, मूग, उडिदाची पिके फस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
------------------
‘रोहयो’च्या कामांची तयारी
वाशिम : जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक जॉबकार्डधारक मजूर आहेत. या कामगारांसाठी कामे सुरू करण्याची तयारी रोहयो विभागाने केली आहे. यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कामाची मागणी नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
---------
झुकलेल्या खांबामुळे अपघाताची शक्यता
वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी उभारलेले वीजखांब पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झुकले आहेत. एखादवेळी खांब कोसळल्यास अपघाताची भीती व्यक्त होत आहे. हे खांब सरळ करण्याची मागणी होत आहे.
------------------
बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी खंडित
वाशिम : गत काही दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेडच्या इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे आपले सरकार केंद्रातील कामे खोळंबून ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
-----------------
जलस्त्रोतांची पातळी वाढली
वाशिम : यावर्षी उन्हाळ्यात बहुतांश जलस्त्रोतांच्या पातळीत लक्षणीय घट झाली. आता पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत. त्यात जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या ८८ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे कूपनलिका, विहिरींची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.
--------------