दुरध्वनीवरूनच होणार समस्यांचे निराकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:58+5:302021-06-09T04:50:58+5:30
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या ५ जून रोजीच्या आदेशानुसार सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र इमारत व ...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या ५ जून रोजीच्या आदेशानुसार सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व घरेलू कामगार कल्याण मंडळाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, कार्यालयाचे कामकाज सुरळीत सुरू राहावे व कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कार्यालयात होणारी गर्दी टाळण्याकरिता सर्व कामगारांनी आपल्या अडचणी, समस्यांबद्दल (७८७५८६७००८) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तथापि, कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्यास याच भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून कार्यालयात भेट देण्याची तारीख व वेळ निश्चित करावी. दिलेल्या वेळेत कार्यालयात यावे, जेणेकरून गर्दी होणार नाही व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी होईल, असे सरकारी कामगार अधिकारी गौ. र. नालिंदे यांनी कळविले आहे.