समृद्धी महामार्गाची मुल्यांकन प्रक्रिया धिम्यागतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 07:22 PM2017-10-10T19:22:58+5:302017-10-10T19:26:13+5:30
वाशिम: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील ५४ गावांमधील १४०९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, त्यास शेतकºयांमधून अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले असतानाच मुल्यांकन प्रक्रिया देखील धिम्यागतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. १० आॅक्टोबरपर्यंत केवळ २१ गावांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया आटोपली असून २५ हेक्टरच्या आसपास भूसंपादन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर ते मुंबई या ७१० किलोमिटर अंतराचा समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असून यामुळे कारंजा, मालेगाव, मंगरूळपीर आणि रिसोड तालुक्यांमधील जमिनी संपादित केल्या जात आहेत. असे असले तरी महामार्ग निर्मिती प्रक्रियेत प्रारंभीपासूनच शेतकºयांच्या विरोधासह विविध स्वरूपातील अडचणी उद्भवल्या असून त्या आजपावेतो कमी झालेल्या नाहीत. अशातच जिल्हास्तरीय समितीची मंजुरात नसल्याने ५४ पैकी तब्बल ३३ गावांच्या मुल्यांकन रखडले असून त्यामुळे पुढची प्रक्रिया देखील खोळंबली आहे. ज्या २१ गावांचे मुल्यांकन आटोपले, त्या गावांमधील भूसंपादन करित असताना सुमारे ५० टक्के जमिनी विविध प्रकारच्या वादात अडकल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यावर मात करून प्रशासनाला महामार्ग निर्मितीचा मार्ग सुकर करावा लागणार आहे.