काेराेना चाचणीला व्यावसायिकांचा अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:37+5:302021-03-13T05:16:37+5:30

सर्व खासगी आस्थापनाधारकांनी ११ ते २१ मार्च या कालावधीत आपली तसेच आस्थापनेत कार्यरत कामगारांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अन्यथा ...

Professional response to the Kareena test | काेराेना चाचणीला व्यावसायिकांचा अल्प प्रतिसाद

काेराेना चाचणीला व्यावसायिकांचा अल्प प्रतिसाद

Next

सर्व खासगी आस्थापनाधारकांनी ११ ते २१ मार्च या कालावधीत आपली तसेच आस्थापनेत कार्यरत कामगारांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अन्यथा २२ मार्चपासून संबंधित आस्थापना बंद ठेवावी लागणार आहे.

याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी बुधवार, १० मार्च रोजी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व दुकानदार, भाजीपाला, फळे, दूधविक्रेते, सलून, जनरल स्टोअर, डेअरी, कापड दुकान, मेडिकल्स, पीठगिरणी, किराणा दुकानदार, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, लॉज यासह इतर सर्व खाजगी आस्थापनाधारक व या आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार यांची कोरोना चाचणी ११ ते २१ मार्च या कालावधीत करणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिका-यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार पुढील आदेशांपर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. परंतु, तरीसुद्धा तालुक्यात याला अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. काही व्यावसायिकांनी चाचणी केली असली, तरी मोठ्या प्रमाणावर अनेक व्यावसायिक यापासून वंचित आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन चाचणीला गती देण्याची गरज आहे.

Web Title: Professional response to the Kareena test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.