प्रगतशील शेतकऱ्यांचा कृषी विभागामार्फत सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:37 AM2021-04-03T04:37:56+5:302021-04-03T04:37:56+5:30
मानोरा तालुक्यातील नागरिकांच्या जीवन जगण्याचे मुख्य साधन शेती हेच असून शेतीसाठी सिंचनाची मोठी प्रकल्प या तालुक्यात नाहीत ,त्यामुळे उपलब्ध ...
मानोरा तालुक्यातील नागरिकांच्या जीवन जगण्याचे मुख्य साधन शेती हेच असून शेतीसाठी सिंचनाची मोठी प्रकल्प या तालुक्यात नाहीत ,त्यामुळे उपलब्ध सिंचन विहीर, कूपनलिका, नदी-नाल्यांच्या आश्रयाने शेती सिंचित करणे याशिवाय पर्याय शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही.
विठोली ता. मानोरा येथील अल्पभूधारक शेतकरी मुंगशीराम उपाध्ये यांनी अडचणीवर मात करून आपल्या थोड्याशा शेतीमध्ये फळपिके,भाजीपाला पिके घेऊन परंपरागत शेती पद्धतीला फाटा देऊन कमी शेतीतही तंत्रज्ञानाच्या साह्याने कृषी विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अधिक उत्पन्न मिळवता येत असल्याचे उदाहरण शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे.
कमीत कमी खर्चामध्ये आणि शेतमजूर मिळत नसलेल्या आजच्या युगात कमीतकमी मनुष्यबळाच्या सहाय्याने फायद्याची शेती करत असल्यामुळे कृषी विभाग मानोराच्या अधिकारी डी. एच. खुडे, जी. एम. इढोळे, संतोष खंडारे कर्मचाऱ्यांनी उपाध्ये यांची दखल घेऊन उपाध्ये यांच्या शेतीवर जाऊन उपाध्ये यांना कृषी कार्यालयामार्फत कृषी विषयक माहितीचे पुस्तक देऊन सत्कारही करण्यात आला.