विजुक्टा, शिक्षक संघटनांकडून शासनाच्या शिक्षण धोरणाचा निषेध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 07:51 PM2017-11-20T19:51:26+5:302017-11-20T19:53:37+5:30
वाशिम जिल्ह्यातील ‘विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन’ (विजुक्टा) व विविध शिक्षक संघटनांनी सोमवार २० नोव्हेंबर रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन विना अनुदानित शाळांच्या प्रलंबित समस्यांसह शासनाच्या शिक्षणविषयक धोरणाचा निषेध केला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील ‘विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन’ (विजुक्टा) व विविध शिक्षक संघटनांनी सोमवार २० नोव्हेंबर रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन विना अनुदानित शाळांच्या प्रलंबित समस्यांसह शासनाच्या शिक्षणविषयक धोरणाचा निषेध केला. यावेळी असंख्य शिक्षकांच्या उपस्थितीत शिक्षणाधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले.
शासनाच्या शिक्षक व शिक्षणविषयक धोरणाचा निषेध करण्यासह अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत विजुक्टा आणि शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शासनाकडे वारंवार मागण्या करूनही त्याची दखल घेण्यात येत नसल्याने या संघटनांच्यावतीने सोमवारी थेट शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या प्रलंबित मागण्यांसह शासनाच्या शिक्षणविषयक धोरणाचा निषेध केला. यापूर्वी विजुक्टा आणि शिक्षक संघटनांच्या सहभागात १८ नोव्हेंबर रोजी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांच्यावतीने शिक्षणाधिकाºयांना सादर करण्यात आले. यामध्ये १ नोव्हेंबर २००५ वा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना सरकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, २३ आॅक्टोबरचा अन्यायकारक शासन आदेश रद्द करावा, विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची यादी घोषीत करून त्यांना अनुदान सूत्र लागू करावे, आॅनलाइन संचमान्यतेत त्वरीत दुरुस्त्या कराव्या, विद्यार्थी हितात्सव शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरतीला त्वरीत अनुमती द्यावी, तसेच शिष्यवृत्तरच्या रकमेत वाढ करण्यासह विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.