१९ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:05+5:302021-01-08T06:10:05+5:30
या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही ...
या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, वाद्य वाजविणे, जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा करणे आदींवर मनाई करण्यात आली.
०००००
अधिकाऱ्यांनी घेतला आरोग्याचा आढावा
मालेगाव : कोरोना स्थिती आणि आगामी काळातील कोरोना लसीकरण यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांनी ६ जानेवारी रोजी मालेगाव येथे आढावा घेतला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे, अशा सूचना दिल्या.
०००००
निवडणुकीदरम्यान शांतता राखा !
रिसोड : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार अजित शेलार यांनी ६ जानेवारी रोजी केले.