मत्स्यसंस्थेत सभासद करून घेण्याच्या मागणीसाठी मेडशी, गोकसावंगी परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 03:15 PM2017-11-13T15:15:32+5:302017-11-13T15:16:35+5:30
वाशिम: प्रकल्पग्रस्तांना मेडशी येथील भावना मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था व गोकसांवगी येथील गणेश मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेमध्ये भागधारक सभासद करून घेण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ नोव्हेंबरपासून उपोषणाला बसले आहेत.
वाशिम: प्रकल्पग्रस्तांना मेडशी येथील भावना मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था व गोकसांवगी येथील गणेश मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेमध्ये भागधारक सभासद करून घेण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ नोव्हेंबरपासून उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्त्यांनी यासंदर्भात यापूर्वी सहायक निबंधक मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था कार्यालय, अकोला यांना निवेदनही दिले होते.
निवेदनानुसार, मेडशी येथे उर्ध्व मोर्णा प्रकल्पावर भावना व श्री गणेश मत्स्य व्यवसाय संस्था कार्यरत आहे. या संस्थेमध्ये प्रकल्पग्रस्ताव्यतिरिक्त इतर अध्यक्ष व सभासद व संचालक मंडळात यांचा समावेश आहे. मात्र या दोन्ही संस्थेमध्ये एकाही प्रकल्पग्रस्ताला सभासद म्हणून समावून घेण्यात आले नाही. यासाठी वेळोवेळी मत्स्य व्यवसाय संस्था कार्यालय, अकोला यांच्याकडे निवेदने दिली. मात्र अधिकाºयांनी या निवेदनाला केराची टोपली दाखविली. १२ नोव्हेंबरपर्यंत प्रकल्पग्रस्तांना सभासद करून घेतले नाही, तर १३ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटूंबासह बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला होता. १२ नोव्हेंबरपर्यंत न्याय न मिळाल्याने १३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले आहेत. निवेदनावर महादेव लक्ष्मण चतरकर, संतोष शिताराम तायडे, प्रकाश बळीराम तायडे, अविनाश वानखेडे, महादेव तायडे, जावेद भवानीवाले, लक्ष्मण वानखेडे, दसरत तायडे, प्रदिप जाधव, संजय राठोड, अनिल तायडे, राजु तायडे, गजानन वानखेडे, संतोष वानखेडे, सुनिल तायडे, सुरेश वानखेडे, बालु वानखेडे यांच्या स्वाक्षºया आहेत.