गोकसावंगी परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:46 PM2017-11-14T13:46:48+5:302017-11-14T13:49:19+5:30

वाशिम:  प्रकल्पग्रस्तांना मेडशी येथील भावना मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था व गोकसांवगी येथील गणेश मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेमध्ये भागधारक सभासद करून घेण्याच्या मागणीसाठी १३ नोव्हेंबरपासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेले उपोषण १४ नोव्हेंबर रोजीदेखील सुरूच आहे. 

project affected peoples fast continue on second day | गोकसावंगी परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण !

गोकसावंगी परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण !

Next
ठळक मुद्देमत्स्यसंस्थेत सभासद करून घेण्याची मागणी पहिल्या दिवशी तोडगा नाही


वाशिम:  प्रकल्पग्रस्तांना मेडशी येथील भावना मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था व गोकसांवगी येथील गणेश मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेमध्ये भागधारक सभासद करून घेण्याच्या मागणीसाठी १३ नोव्हेंबरपासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेले उपोषण १४ नोव्हेंबर रोजीदेखील सुरूच आहे. 
सहायक निबंधक मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था कार्यालय, अकोला यांना दिलेल्या निवेदनानुसार, मेडशी येथे उर्ध्व मोर्णा प्रकल्पावर भावना व श्री गणेश मत्स्य व्यवसाय संस्था कार्यरत आहे. या संस्थेमध्ये प्रकल्पग्रस्ताव्यतिरिक्त  इतर अध्यक्ष व सभासद व संचालक मंडळात यांचा समावेश आहे. मात्र  या दोन्ही संस्थेमध्ये एकाही प्रकल्पग्रस्ताला सभासद म्हणून समावून घेण्यात आले नाही.  यासाठी वेळोवेळी मत्स्य व्यवसाय संस्था कार्यालय, अकोला यांच्याकडे निवेदने दिली. मात्र अधिकाºयांनी या निवेदनाला केराची टोपली दाखविली. १२ नोव्हेंबरपर्यंत प्रकल्पग्रस्तांना सभासद करून घेतले नाही, तर १३ नोव्हेंबरपासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटूंबासह बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा  दिला होता. १२ नोव्हेंबरपर्यंत न्याय न मिळाल्याने १३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले. पहिल्या दिवशी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे १४ नोव्हेंबर रोजीदेखील उपोषण सुरू आहे. प्रशासनातर्फे जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला. महादेव लक्ष्मण चतरकर, संतोष शिताराम तायडे, प्रकाश बळीराम तायडे, अविनाश वानखेडे, महादेव तायडे, जावेद भवानीवाले, लक्ष्मण वानखेडे, दसरत तायडे, प्रदिप जाधव, संजय राठोड, अनिल तायडे, राजु तायडे, गजानन वानखेडे, संतोष वानखेडे, सुनिल तायडे, सुरेश वानखेडे, बालु वानखेडे यांच्यासह अनेकजण उपोषणाला बसले आहेत.

Web Title: project affected peoples fast continue on second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.