इन्सपायर अवाॅर्डसाठी ४७ पैकी १८ विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट अपलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:48 AM2021-09-17T04:48:52+5:302021-09-17T04:48:52+5:30
जिल्ह्यातील ४७ विद्यार्थ्याची निवड ऑनलाईन जिल्हास्तरीय इन्स्पायर अवाॅर्ड प्रदर्शन २०२०-२०२१ साठी झालेली आहे. यातील काही विद्यार्थ्याचे पैसे माहे ...
जिल्ह्यातील ४७ विद्यार्थ्याची निवड ऑनलाईन जिल्हास्तरीय इन्स्पायर अवाॅर्ड प्रदर्शन २०२०-२०२१ साठी झालेली आहे. यातील काही विद्यार्थ्याचे पैसे माहे फेब्रूवारी महिन्यातच (१०,००० रु.) त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले असून, काहींच्या खात्यात पैसे जमा केले जात असून, या ४७ विद्यार्थ्याना ऑनलाईन प्रदर्शनात सहभागी व्हायचे आहे. या ऑनलाईन प्रदर्शनासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोजेक्ट १८ सप्टेंबरपर्यंत अपलोड करणे आवश्यक असतानाही १६ सप्टेंबरपर्यंत केवळ १८ विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट अपलोड केले आहे. आता उर्वरित २९ विद्यार्थ्यांना कोणत्याही स्थितीत दोन दिवसात त्यांचे प्रोजेक्ट अपलोड करणे आवश्यक आहे.
-------------
अशी आहे प्रोजेक्ट अपलोडची प्रक्रिया
प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्ले स्टोरवरून इन्स्पायर अवाॅर्ड मानक ॲप डाऊनलोड यूजर आय डी म्हणून रीफ्रांन्स नंबर टाकायचा व गेट पासवर्डवर क्लिक करावे. यानंतर काही वेळात मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवर यूजर आयडी व पासवर्डचा टेक्स्ट मेसेज येतो. त्यानुसार ॲपमधे लॉगीन करून ,२ मिनिटाचा व्हिडीओ २ मिनिटाचा ऑडीओ, ४ फोटो (प्रोजेक्टचे) व हजार शब्दापर्यंतची आपल्या प्रोजेक्टबाबत माहिती भरावी लागते. त्यानंतर सर्वात शेवटी फायनल सबमिशन करावे.
०००००००००००००००००००००
कोट: आतापर्यंत ४७ पैकी फक्त १८ विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट अपलोड झालेले आहेत अजुन २९ विद्यार्थ्यांचे अपलोड करायचे बाकी आहेत, ज्यांचे अपलोड करायचे बाकी आहेत त्यांनी १८ सप्टेंबर २०२१ पर्यंत अपलोड करावे, हे करत असताना काही अड़चण आल्यास आपल्याशी फोनवर संपर्क साधावा किंवा मेसेज करावा.
विजय भड,
समन्वयक इन्सपायर अवाॅर्ड, वाशिम