पुरवठा विभागातील २१ कर्मचाऱ्यांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 01:20 PM2018-11-05T13:20:04+5:302018-11-05T13:20:20+5:30
वाशिम: अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या ५ जिल्ह्यातील पुरवठा विभागात कार्यरत अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षक मिळून २१ कर्मचाऱ्यांना निरीक्षण अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या ५ जिल्ह्यातील पुरवठा विभागात कार्यरत अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षक मिळून २१ कर्मचाऱ्यांना निरीक्षण अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ऐन दिवाळीपूर्वी ३ नोव्हेंबर अमरावती आयुक्तांनी या संदर्भातील आदेश पारित केल्याने कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
अमरावती विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना निरीक्षण अधिकारी या संवर्गात पदोन्नती देण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २ नोव्हेंबर रोजी पदोन्नती समितीची बैठक अमरावती येथे पार पडली. विभागीय पदोन्नती समितीने दिलेली मान्यता आणि आस्थापना मंडळाच्या ३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बैठकी पदस्तापनेबाबत केलेल्या शिफारशीनुसार अटीच्या अधीन राहून, तसेच निरीक्षण अधिकारी संवर्गातील पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांपैकी खुल्या प्रवर्गातील रिक्त पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून अमरावती विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील २१ कर्मचाºयांना निरीक्षण अधिकारी म्हणून पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील तीन, अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी चार, तर वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी ५ कर्मचाºयांचा समावेश आहे.