प्रचारतोफा थंडावल्या; उद्या मतदान

By admin | Published: August 3, 2015 02:24 AM2015-08-03T02:24:43+5:302015-08-03T02:24:43+5:30

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी वाशिम जिल्ह्यातील १0 अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त.

Promotions stopped; Voting tomorrow | प्रचारतोफा थंडावल्या; उद्या मतदान

प्रचारतोफा थंडावल्या; उद्या मतदान

Next

वाशिम : १५४ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक व एका ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी ४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ५८२ केंद्रांवर मतदान होणार आहे. दरम्यान, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३0 वाजतानंतर प्रचारतोफा थंडावल्या असून, मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. १0 अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामीण भागातील ह्यराजकारणह्ण ढवळून काढणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगातर्फे २३ जुनला जाहीर झाला. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रीया आता अंतिम टप्प्यात पोचली असून, मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठे पले आहे. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३0 वाजतानंतर प्रचारतोफा थंडावल्या असून, आता उमेदवारांना मूकपद्धतीने प्रचार करावा लागणार आहे. गावकरी व प्रशासनाच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरीत १५४ ग्रामपंचायतींसाठी मतदार होणार आहे. वाशिम तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीमध्ये १८३ जागांसाठी, रिसोड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीमध्ये २९0 जागांसाठी, मालेगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीमध्ये २0६ जागांसाठी, मंगरूळपीर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीमध्ये १७२ जागांसाठी, कारंजा तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीमध्ये २१४ जागांसाठी व मानोरा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीमध्ये १६२ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तर कारंजा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यातून एकूण २५६ उमेदवार अविरोध झाल्याने आता १२२७ जागेसाठी एकूण ३0८६ उमेदवार नशिब आजमावत आहेत. १५४ ग्राम पंचायतीसाठी जिल्ह्यातील ५८२ केंद्रांवर मतदान होणार असून, यासाठी २ हजार ९१0 अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त आहे.

Web Title: Promotions stopped; Voting tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.