ग्रा.पं.मध्ये मालमत्ताधारकांचे रेकॉर्डच उपलब्ध नाही !

By admin | Published: April 2, 2017 02:23 AM2017-04-02T02:23:56+5:302017-04-02T02:23:56+5:30

कोंडाळा महाली ग्रा.पं.मध्ये मालमत्तेची फेरफार नोंदच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.

Property holders are not available in Gram Panchayat! | ग्रा.पं.मध्ये मालमत्ताधारकांचे रेकॉर्डच उपलब्ध नाही !

ग्रा.पं.मध्ये मालमत्ताधारकांचे रेकॉर्डच उपलब्ध नाही !

Next

कोंडाळा महाली (वाशिम), दि. १- गावातील मालमत्तेच्या नमुना ८ अ, फेरफार नोंदीबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली असता, सदर मालमत्तेची फेरफार नोंदच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.
माहितीचा अधिकार अधिनियम २00५ अन्वये लाभार्थीने मालमत्ता क्रमांक ९९ चे मालमत्ताधारक देवीदास पांडुरंग भोसले यांच्या जागेचा नमुना ८ अ कोणत्या आधारे बनविण्यात आला, त्याबाबत फेरफार व नोंदीची माहिती शासकीय माहिती अधिकारी तथा कोंडाळा महाली गट ग्राम पंचायतचे सचिव नारायण महाले यांच्याकडे १८ जानेवारी रोजी मागितली होती. विहीत मुदतीमध्ये त्यांनी माहिती न दिल्यामुळे २ मार्च २0१७ रोजी गटविकास अधिकारी वाशिम यांच्याकडे अपिल केले. या अपिलावर २७ मार्च रोजी सुनावणी झाली. यावेळी ग्रामपंचायत सचिव एन.के. महाले यांनी ग्रा.पं. कार्यालयामध्ये फेरफार व नोंदीबाबत रेकॉर्ड उपलब्ध नाही, असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली. सदर माहिती उपलब्ध नसल्याने तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करा, असा उरफाटा सल्ला विस्तार अधिकारी खिल्लारे यांनी दिला.

सदरची माहितीबाबत अर्ज आपणांस प्राप्त झाला आहे. ही माहिती शासन दरबारी उपलब्ध नसून याबाबत तुम्ही पोलिसात तक्रार करा व कोर्टात केस दाखल करा.

- व्ही. के. खिल्लारे
विस्तार अधिकारी पंचायत
पंचायत विभाग पं.स. वाशिम

सदर माहितीबाबत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये फेरफार व नोंदीचे रेकॉर्ड उपलब्ध नाही.
- नारायण किसन महाले
ग्राम पंचायत सचिव
कोंडाळा महाली

Web Title: Property holders are not available in Gram Panchayat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.