वाढत्या अतिक्रमणामुळे मालमत्ताधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:41 AM2021-03-31T04:41:47+5:302021-03-31T04:41:47+5:30
खासगी जागेवर अतिक्रमण करत काहींनी आपली दुकाने थाटली आहेत, तर काहींनी काहीही व्यवसाय न करता अतिक्रमण करून ठेवले. काही ...
खासगी जागेवर अतिक्रमण करत काहींनी आपली दुकाने थाटली आहेत, तर काहींनी काहीही व्यवसाय न करता अतिक्रमण करून ठेवले. काही अतिक्रमणधारक जागा साेडताे; परंतु पैशाची मागणी करीत असल्याचेही समजते. काही जण तर दुसऱ्याच्या जागेवर आपला ताबा दर्शवून त्या मालमत्ताधारकांना वेठीस आणत आहेत. त्यामुळे रिसोड शहरातील मालमताधारक हे या सर्व प्रकाराला भयभीत झाले आहेत. आपल्या स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेवर अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित मालमत्ताधारकांनी रिसोड पोलीस स्टेशनकडे अनेक वेळा तक्रारीसुद्धा दिल्या; परंतु कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही संबंध नसल्यासारखा प्रकार रिसोड पोलीस स्टेशनकडून होत आहे. मागील काही वर्षापासून अनेक लोकांच्या खासगी मालमत्तेवर अतिक्रमण करून त्यांना वेठीस धरून हा एक प्रकारचा व्यवसाय रिसोड शहरात सुरू दिसून येत आहे.
सक्षम अधिकारी नेमणूक करून संबंधित मालमत्ताधारकांचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी होत आहे. याबाबत वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना विचारणा केली असता असा जर प्रकार घडत असेल तर संबंधित मालमत्ताधारकांनी रिसोड पोलीस स्टेशनकडे तक्रार करावी, याबाबत मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून तक्रारदारांना न्याय देईल, असे सांगितले.