मालेगावला चाकातीर्थ प्रकल्पातून पाणी पुरवठय़ाचा प्रस्ताव धूळ खात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:19 AM2018-02-01T01:19:23+5:302018-02-01T01:20:48+5:30

मालेगाव : शहराला पाणी पुरवठा करणार्‍या कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पातील जलसाठय़ात झपाट्याने घट होत असून, आगामी महिनाभर पुरेल, एवढाच जलसाठा सध्या शिल्लक राहिला आहे.

Proposal of water supply from Malegaon Chakathirth project dhul! | मालेगावला चाकातीर्थ प्रकल्पातून पाणी पुरवठय़ाचा प्रस्ताव धूळ खात!

मालेगावला चाकातीर्थ प्रकल्पातून पाणी पुरवठय़ाचा प्रस्ताव धूळ खात!

Next
ठळक मुद्देपाणी प्रश्न होणार गंभीर कुरळा प्रकल्पात उरला जेमतेम जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहराला पाणी पुरवठा करणार्‍या कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पातील जलसाठय़ात झपाट्याने घट होत असून, आगामी महिनाभर पुरेल, एवढाच जलसाठा सध्या शिल्लक राहिला आहे. दुसरीकडे चाकातीर्थ प्रकल्पावरून कुरळा धरणात पाणी सोडण्याचा प्रश्नही प्रलंबित असल्याने २५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मालेगाव शहराचा पाणी प्रश्न आतापासूनच गंभीर झाला असून, लवकर प्रभावी उपाययोजना न केल्यास पाण्यासाठी हाहाकार माजणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पावरून शहरास पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी मात्र पर्जन्यमान घटण्यासोबतच प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे धरणातून अवैधरीत्या पाणी उपसा झाला. त्यामुळे जलसाठय़ात झपाट्याने घट झाली. सध्या तलावात पुढील एक महिना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे.
दरम्यान, पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता मालेगावला चाकातीर्थ लघुपाटबंधारे प्रकल्पावरून पुरक पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नगर पंचायतने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यास मात्र अद्याप मंजुरात मिळाली नसून, आगामी महिनाभरात प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्ष काम पूर्ण न झाल्यास मालेगावकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेन, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मालेगाव शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी चाकातीर्थ लघुपाटबंधारे तलावातून कुरळा लघुपाटबंधारेच्या विहिरीत पाणी आणावे लागणार आहे. त्यासाठी तात्पुरत्या पूरक पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी १0 लाख रुपये अंदाजित खर्चाचा प्रस्ताव जिल्ह्याधिकार्‍यांनी मंजूर केला असून, पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे. कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेचा चाकातीर्थ ते मालेगाव शहर असा ३४ कोटी रुपये अंदाजित खर्चाचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दोन्ही प्रस्तावांना मात्र अद्याप शासनाची मंजुरात मिळालेली नाही.
- मीनाक्षी परमेश्‍वर सावंत, नगराध्यक्ष, मालेगाव

Web Title: Proposal of water supply from Malegaon Chakathirth project dhul!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.