संजय गांधी निराधार समिती सभेत ११३ प्रकरणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 02:00 PM2017-08-16T14:00:27+5:302017-08-16T14:00:27+5:30

proposals approved in meeting | संजय गांधी निराधार समिती सभेत ११३ प्रकरणे मंजूर

संजय गांधी निराधार समिती सभेत ११३ प्रकरणे मंजूर

Next

 मालेगाव - मालेगाव तालुका संजय गांधी निराधार समितीची सभा १५ आॅगस्ट रोजी पार पडली असून, यावेळी एकूण ११३ प्रकरणांना मंजूर प्रदान करण्यात आली. गोरगरीब, वृद्ध, निराधार, दिव्यांग आदींना शासनातर्फे दरमहा मानधन दिले जाते. यासाठी संजय गांधी  निराधार समितीतर्फे लाभार्थींची निवड केली जाते. दलालांची लुडबूड थांबविण्यासाठी यावर्षी अर्ज प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात आली. अर्ज प्राप्त झाल्यानंतर १५ आॅगस्टला सभा घेण्यात आली. या सभेत १६१ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी संजय गांधी निराधार, दिव्यांग योजनेसाठी २३, संजय गांधी विधवा, निराधार योजनेसाठी २३, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेसाठी २०, श्रावणबाळ योजनेसाठी ४७ असे एकूण ११३ अर्ज मंजूर झाले आहेत. यावेळी तहसीलदार राजेश वजीरे, समिती अध्य्क्ष मारोतराव लादे, समिती सदस्य सुनील घुगे, नितिन काळे, अमोल माकोडे, संगिता राऊत, दीपक दहात्रे, संजय केकन, साहेबराव नवघरे, डॉ. ढवळे यांच्यासह तहसील कार्यालयाचे  कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: proposals approved in meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.