काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईनसाठी ५० लाखांचा प्रस्ताव दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:31 PM2017-11-28T16:31:20+5:302017-11-28T16:36:40+5:30
मालेगाव शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईन होेणे गरजेचे असून त्यासाठी ५० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नगर पंचायतच्या अध्यक्ष मिनाक्षी परमेश्वर सावंत यांनी मंगळवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईन होेणे गरजेचे असून त्यासाठी ५० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नगर पंचायतच्या अध्यक्ष मिनाक्षी परमेश्वर सावंत यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून मालेगावकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
मालेगाव शहराच्या आजुबाजुला कोल्ही, केळी, कुरळा आणि काटेपूर्णा हे मोठे प्रकल्प असून क्षमता अधिक असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काटेपुर्णा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतो. ही बाब लक्षात घेवून काटेपुर्णातील पाणी कुरळा धरणापर्यंत आणून ते मालेगावकरांना उपलब्ध करून देण्याकरिता मालेगाव नगर पंचायतीने प्रयत्न सुरू केले असून यासंबंधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पत्र सादर करण्यात आले असून यासाठी लागणारे अडीच लाख रुपयांचे प्रकल्प व्यवस्थापन शुल्कही अदा करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरी मिळताच हे काम सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष सावंत यांनी दिली.