प्रस्तावित ठाण्यांचे कार्यान्वयन रखडले
By admin | Published: September 17, 2014 01:25 AM2014-09-17T01:25:00+5:302014-09-17T01:25:00+5:30
कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्याचा निर्णय पदमान्यतेच्या पुढे सरकलाच नाही.
वाशिम : जिल्हा निर्मितीला १७ वर्षाचा कालावधी लोटला. वाढते गुन्ह्याचे प्रमाण व वाढती लोकसंख्या लक्षात घेता जिल्हा पोलिसदलाकडून तीन वर्षांपूर्वी तीन नवीन पोलिस ठाणे
निर्मितीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र त्याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही.
त्यामुळे अगोदर पदमान्यता मिळेलेल्या कारंजा पोलिस ठाण्याचा प्रश्नसुद्धा अंधातरीच राहीला आहे. वाशिम जिल्हा निर्मीतीपासुन जिल्हयात वाशिम, मंगरूळपीर, कारंजा या तीन पोलिस उपविभागात ११ पोलीस ठाणे आहेत. जिल्हा निर्मितीनंतर वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्याची तेवढी भर पडली. यामुळे वाशिम पोलीस ठाण्यावरील कामाचा ताण कमी झाला. त्यानंतर मंगरूळपीर, कारंजा, धनज बु. पोलिस ठाण्यांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी शेलुबाजार, कारंजा ग्रामीण व कामरगाव पोलिस स्टेशनची मागण्ी पुढे आली. या मागणीला ऑक्टोबर २0११ मध्ये प्रस्तावाचे रूप देऊन तीनही पोलिस स्टेशनच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनदरबारी सादर केला. या प्रस्तावाच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून तीनपैकी कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन निर्मितीसाठी हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर शासनाने कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या निर्मिती व कार्यन्वीततेसाठी आवश्यक पदमान्यता देण्याचे काम केले. मात्र त्यानंतर नवीन पोलिस ठाण्याचे काम रखडलेलेच आहे.
कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनला शासनाने तत्वत: मंजुरात देवून पदांनाही मान्यता दिली, परंतु पोलीस स्टेशनच्या कार्यान्विणासाठी आवश्यक नोटीफिकेशन निघाले नसल्याने नवीन पोलिस ठाण्याचा प्रश्न रखडला असल्याचे प्रभारी पोलिस उपअधिक्षक आर. एस. पाटील यांनी सांगीतले.
जऊळका पोलिस स्टेशनअंतर्गंत येत असलेल्या ४६ गावांशिवाय किन्हीराजा पोलिस चौकी अंतर्गत येणार्या गावांचा शेलुबाजार पोलिस स्टेशनमध्ये समावेश करता येवू शकतो. त्यामध्ये पिंप्री अवगण, सोयता, भोयता, दुधखेडा आदी गावांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
नागपूर - औरंगाबाद द्रुतगती महामार्गावरील प्रस्तावित कामरगाव पोलिसठाण्यची निर्मिती झाल्यास गुन्हांवर अंकुश बसुन कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनसह धनज बु. पोलीस स्टेशनवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल.
कारंजा पोलिस स्टेशन अंतर्गत ७३ गावातील संरक्षणाची जबाबदारी ८४ पोलीस अधिकारी कर्मचारी साभाळताहेत. मंजुरात १0३ अधिकारी कर्मचार्यांच्या पदांना असली तरी आधीच कामाचा प्रचंड मोठा आवाका असलेल्या कारंजा पोलीस स्टेशनच्या दिमतीला कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनची कार्यान्वितता तातडीने क्रमप्राप्त आहे.