समृद्धी महामार्गाने बाधित शेतकरी नाशिकच्या संपर्कात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:06 AM2017-07-20T01:06:14+5:302017-07-20T01:06:14+5:30

वाशिम : समृद्धी महामार्ग निर्मितीला विरोध करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला आहे.

Prosperity is in contact with the affected highways by Nashik! | समृद्धी महामार्गाने बाधित शेतकरी नाशिकच्या संपर्कात!

समृद्धी महामार्गाने बाधित शेतकरी नाशिकच्या संपर्कात!

Next

वाशिम : समृद्धी महामार्ग निर्मितीला विरोध करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला आहे.
समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी नागपूर ते मुंबईदरम्यान येणाऱ्या ११ जिल्ह्यातील शेती संपादित केली जाणार आहे. मात्र, जवळपास सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जमीनी देण्यास विरोध आहे. कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांमधील ५४ गावांमधून जाणाऱ्या या महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकरी तयार नाहीत. वेळप्रसंगी आंदोलनाची दिशा ठरविता येण्यासाठी या गावातील शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधला आहे. त्यांच्या मार्गदर्शनात नेमकी दिशा ठरविली जाणार आहे.

Web Title: Prosperity is in contact with the affected highways by Nashik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.