समृद्ध गाव स्पर्धेची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:41 AM2021-01-23T04:41:48+5:302021-01-23T04:41:48+5:30

---------- संमतिपत्रासाठी शिक्षकांच्या घरोघर भेटी इंझोरी: शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले. ...

Prosperous Village Competition Review Meeting | समृद्ध गाव स्पर्धेची आढावा बैठक

समृद्ध गाव स्पर्धेची आढावा बैठक

googlenewsNext

----------

संमतिपत्रासाठी शिक्षकांच्या घरोघर भेटी

इंझोरी: शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले. यासाठी पालकांचे संमतिपत्र आवश्यक असल्याने पालकांचा कल घेण्यासाठी शिक्षक घरोघर भेटी देत असल्याचे चित्र इंझोरीत शुक्रवारी दिसून आले.

---------------------

उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी मार्गदर्शन

इंझोरी: जिल्ह्यात गतवर्षी दमदार पाऊस पडल्याने जलस्रोतांत मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामासोबतच उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढविण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न असून, या अंतर्गत मानोरा तालुक्यात उन्हाळी भुईमूग लागवडीबाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यात गुरुवारी इंझोरी परिसरात कृषी सहायकांनी शेतक-यांना या संदर्भात मार्गदर्शन केले.

------------------------

अडाण पात्रात फळलागवडीची तयारी

इंझोरी: कारंजा-मानोरा मार्गादरम्यान वाहणा-या अडाण नदीच्या पात्रातील गाळपेर क्षेत्रात दरवर्षी परजिल्ह्यातील शेतकरी ठोका पद्धतीने फळपिकांची लागवड करतात. आता टरबूज, खरबूज पिकांच्या लागवडीचा कालावधी सुरू झाल्याने हे शेतकरी फळपिकांच्या लागवडीची लगबग करू लागले आहेत. त्यासाठी बियाण्यांसह इतर साहित्याची जुळवाजुळव त्यांनी केली आहे.

===Photopath===

220121\22wsm_2_22012021_35.jpg

===Caption===

समृद्ध गाव स्पर्धेची आढावा बैठक 

Web Title: Prosperous Village Competition Review Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.