पेट्राेल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:51 AM2021-06-09T04:51:11+5:302021-06-09T04:51:11+5:30
मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून पेट्रोल, डिझेल, गॅससारख्या इंधनाची प्रचंड दरवाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा सर्वसामान्य माणसावर मोठा अनिष्ट ...
मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून पेट्रोल, डिझेल, गॅससारख्या इंधनाची प्रचंड दरवाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा सर्वसामान्य माणसावर मोठा अनिष्ट परिणाम होत आहे. वर्षभरात डिझेलचे दर ६५ रुपयांवरून ९२.५३, पेट्रोल ७५ ते ७८ वरून १०१.८८ रुपये इतके वाढले आहेत. गॅस सिलिंडरही ६०० रुपयांवरून ८३० रुपयांपर्यंत महागले आहेत. इंधन दरवाढीचा निषेध म्हणून ७ जून रोजी एकांबा रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी पंचायत समिती सदस्य शकीलखा पठाण, सलीम रेघीवाले, सलीम गवळी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष देशमुख, मधुकर काळे, माजी सरपंच गणेश भालेराव, गजानन ईरतकर, नंदकिशोर गोरे, अमित वाघमारे, कपिल भालेराव,पांगरखेड येथील रमेश चव्हाण, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दामू अण्णा इंगोले हेही उपस्थित होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.