शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्ता राेकाे
By नंदकिशोर नारे | Published: September 21, 2022 03:27 PM2022-09-21T15:27:03+5:302022-09-21T15:27:40+5:30
मानाेरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांची मोठी नासाडी झाली.
वाशिम :
मानाेरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांची मोठी नासाडी झाली. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा, वन्यप्राण्याचा हौदोस थांबवा,आणी घरकुलाच्या अनुदानात वाढ करा, शेतकऱ्यांना शेतीला तार कुंपण मिळावे.आदी मागण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले होते.सदर मागणीची दखल शासनाने न घेतल्यामूळे शहरातील ग्रामीण रूग्णालयाच्या समोर २१ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
पोहरादेवी येथील रमेश महाराज यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते.यावेळी शहरांतील अर्धातास वाहतुक ठप्प झाली होती. बुधवार आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाने मागणीची पूर्तता करण्यासाठी वरिष्ठाला पाठपुरावा करणार असे आश्वासन देण्यात आले. आणी दिलेले निवेदन स्वीकारले. त्यामूळे सदर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी रमेश महाराज, शेतकरी नेते मनोहर राठोड, दिलीप चव्हाण, पृथ्वीराज राठोड, मखराम पवार, सुधाकर महाराज, बाबूलाल राठोड, दत्ता महाराज, संजय राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित हाेते.