सिरियात रशियाने केलेल्या हवाई हल्ल्याचा कारंजा येथे निषेध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 05:56 PM2018-03-03T17:56:11+5:302018-03-03T17:56:11+5:30
कारंजा लाड - सिरियाची राजधानी दमिश्क परिसरात १९ फेब्रुवारीपासून रशियाने मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या घटनेच्या निषेधार्थ ३ मार्च रोजी भारिप-बमसंतर्फे कारंजा तहसिलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.
कारंजा लाड - सिरियाची राजधानी दमिश्क परिसरात १९ फेब्रुवारीपासून रशियाने मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या घटनेच्या निषेधार्थ ३ मार्च रोजी भारिप-बमसंतर्फे कारंजा तहसिलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सीरियाची राजधानी दमिश्क येथील पूर्वीघूटा परिसरात रशियाने केलेल्या हल्ल्यात अनेक निरपराध महिला, पुरुष व लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान तेथील परिस्थिती अत्यंत भयानक झाली आहे. सिरीयामधील निरपराध लोकांवर सशस्त्र बल व असामाजिक तत्व तसेच तत्वहीन लोकांनी हा भ्याड हल्ला केला असून, या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र विरोध करीत असून भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी भारतीय जनतेकडून सिरीया दूतावास व परराष्ट्रमंत्री तसेच मंत्रालयाच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवावा व चिंता व्यक्त करावी अशी मागणी करण्यात आली. निवेदन सादर करताना भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी, जि.प. सदस्य मोहन महाराज, राजाभाऊ चव्हाण, न.पा उपाध्यक्ष जुम्मा पप्पूवाले, गटनेता व शिक्षण सभापती फिरोज शेकुवाले, तालुकाध्यक्ष भारत भगत, शेषराव चव्हाण, बंडू भाऊ इंगोले, किशोर मानकर, नगरसेवक निसार खान, युनूस खान पहेलवान, राउफ खान मामू, अब्दुल एजाज अ. मन्नान, सलीम गारवे, रशीद निनसुरवाले, सलीम प्यारेवाले, जाकीर शेख, निखिल घोंगडे,उस्मान खान, सचिन कोराट,मोहसीन खान, सय्यद मुजाहिद, अब्दुल रज्जाक, हाफिज सय्यद अहमद, नजीमोद्दीन, हामिद खान, मो जमीर,नाजिर खान,देवराव कटके, अनिल राठोड,अरुण रोकड़े, दिलीप सावजी, सतीश गुळदे, सुभाष राउत,दीपक आठवले,भाऊराव मोहड़, कौसर पहेलवान, तारासिंग राठोड, विलास वर, गजानन तिडके, उत्तमराव कांबळे,शामराव कांबळे, विजय ननावरे, एजाज खान, अब्दुल मुजीब, मोहसीन पठाण, अब्दुल नईम, शब्बीर अली, पी.सी.कडू, अहमद, तौसीफ खान आदि सह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.