Video : वाशिम येथे शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:15 PM2018-10-20T13:15:23+5:302018-10-20T15:43:04+5:30

वाशिम येथे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात शनिवारी सकाळी ११.३० वाजतापासून चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

protest by swabhimani shetkari sanghatna at Washim | Video : वाशिम येथे शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

Video : वाशिम येथे शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शेतकºयांना पीक विमा, शेतमालास हमीभाव, तसेच नुकसानापोटी आर्थिक मदत म्हणून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विदर्भात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या अंतर्गत वाशिम येथे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात शनिवारी सकाळी ११.३० वाजतापासून चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील शेतकरी विविध नैसर्गिक संकटाने पिचला असतानाच शासनाकडून अद्याप नैसर्गिक आपत्तीपोटी आर्थिक मदत मिळाली नाही, तसेच पीकविमाही मंजूर झालेला नसून, बाजारात कोणत्याच शेतमालास हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. शेतकºयांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात शनिवार २० आॅक्टोबर रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे वाशिम तालुकाध्यक्ष अनंता मानकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनामुळे पुसद नाका परिसरात अर्धा तास वाहतूक खोळंबली होती.

Web Title: protest by swabhimani shetkari sanghatna at Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.