पायाभूत सुविधा विकास योजनेसाठी १५ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:39+5:302021-06-29T04:27:39+5:30

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या योजनेअंतर्गत आईस्क्रिम, चीज निर्मिती, दूध पाश्चरायझेशन, दूध पावडर, मांस निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, ...

Provision of Rs. 15 crore for infrastructure development scheme | पायाभूत सुविधा विकास योजनेसाठी १५ कोटींची तरतूद

पायाभूत सुविधा विकास योजनेसाठी १५ कोटींची तरतूद

Next

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या योजनेअंतर्गत आईस्क्रिम, चीज निर्मिती, दूध पाश्चरायझेशन, दूध पावडर, मांस निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटिन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती व प्रक्रिया, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा आदी स्वरूपातील उद्योग व्यवसायांना ९० टक्केपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्याजदरातही तीन टक्के सूट देण्यात येईल.

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारच्या पशुपालन व डेअरी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्य पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावरही या माहितीबाबतची लिंक देण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. नमूद उद्योग व्यवसायासोबत लिंग निश्चिती, वीर्यमात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातीचे संवर्धन आदी बाबींचा समावेश केलेला आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखेडे यांनी सांगितले.

.....................

बाॅक्स :

ऑनलाईन पद्धतीने अर्जप्रक्रिया

जिल्ह्यातील व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खासगी संस्था, कलम आठअंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, योजनेसंदर्भात वारंवार उपस्थित करण्यात येणारे प्रश्न, योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या अर्जांचा नमुना आणि यादी आदी माहिती दिली जात आहे. तथापी, इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखेडे यांनी केले आहे.

Web Title: Provision of Rs. 15 crore for infrastructure development scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.